Breaking News

परमात्मा सर्वांवर सारखेच प्रेम करतो -अतुल भारद्वाज महाराज; खोपोलीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सव

खालापूर : प्रतिनिधी

जो मानव प्रेम करतो, सर्वांना आनंद देतो, सुखाचा सहवास देतो अशा मानवाच्या सुखदुःखात देव सहभागी होतो. परमात्मा सर्वांवर सारखेच प्रेम करतो, असे प्रतिपादन वृंदावन निवासी  अतुल कृष्णजी भारद्वाज महाराज यांनी खोपोली येथे सोमवारी (दि. 27) केले.

खोपोली, खालापूर, कल्याण, ठाणे, पुणे येथील जाखोटिया परिवारातर्फे खोपोलीतील गोकुळधाम लोहाणा महाजनवाडी सभागृहात श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, या सोहळ्यात  श्री अतुल कृष्णजी भारद्वाज महाराज भागवत दररोज कथामृत सांगत आहेत. या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवात राज्यभरातील जाखोटिया कुटुंबिय सहभागी झाले असून, शुक्रवारी (दि. 31)  या सोहळ्याची सांगता होणार आहे.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply