Breaking News

स्वाईन फ्लू : आजार आणि उपचार

राज्यात सततच्या होणार्‍या तापमान बदलामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. स्वाईन फ्लू रुग्णाने त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. याबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाईन फ्लूवर ऑसेलटॅमीवीर म्हणजेच ‘टेमिफ्लू’ हे औषध उपलब्ध आहे. स्वाईन फ्लू सदृश लक्षणे (सर्दी, ताप) दिसल्यास 24 तासांमध्ये टेमिफ्लूचे औषध सुरू करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. रुग्णाला ‘टेमिफ्लू’ हे औषध 24 तासांच्या आत दिल्यास रुग्णाचा मृत्यू टाळता येऊ शकतो, तसेच ही गोळी सुरक्षित असल्यामुळे त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत नाहीत. स्वाईन फ्लूसाठी प्रतिबंधात्मक लस देखील उपलब्ध आहे व त्याची प्रतिकारशक्ती 8 ते 12 महिने टिकते. स्वाईन फ्लू वर प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाने इन्फ्लुएंझा प्रतिबंध व नियंत्रण मोहीम हाती घेतली आहे. स्वाईन फ्लू वर उपचारासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्रात नागपूर, पुणे, नाशिक व ठाणे यामध्ये स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

भारतात स्वाईन फ्लूचे रुग्ण मुख्यतः दोन ऋतूमध्ये आढळतात. ते म्हणजे हिवाळा आणि पावसाळा. थंड हवामान स्वाईन फ्लू विषाणूसाठी पोषक असते. स्वाईन फ्लूचा विषाणू हा अतिसूक्ष्मजीव असून तो श्वसन प्रक्रियेवर परिणाम करतो. स्वाईन फ्लूच्या रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यास त्यांचे गंभीर परिणाम दिसून येतात. किंबहुना रुग्णाचा मृत्यूदेखील ओढवू शकतो.

स्वाईन फ्लूची लक्षणे- सर्दी, खोकला, नाक गळणे, वारंवार शिंका, घशात खवखव, घसा दुखी, थंडी वाजून ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी ही स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत.

बालरुग्णांमध्ये सौम्य व मध्यम स्वरूपाचा ताप आढळून येतो. घसादुखी असणार्‍या बाळाच्या तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळताना आढळून येते. काही बालकांमध्ये जुलाब व उलट्या अशी लक्षणेसुद्धा दिसून येतात.

प्रतिकार शक्ती कमी असणार्‍या व्यक्तींमध्ये अनेक वेळा तापाचे लक्षण दिसून येत नाही. इन्फ्लुएंझा सर्वेक्षणात फ्लू सदृश रुग्णांच्या सर्वेक्षण सोबतच तीव्र श्वसनदाह (डर्शींशीश -र्लीींश ठशीळिीरीेीूं खश्रश्रपशीी-ड-ठख) असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण देखील महत्त्वाचे आहे.

तीव्र श्वसनदाह असलेल्या 5 वर्षाखालील मुलांमध्ये न्यूमोनिया व 5 वर्षांवरील व्यक्तींमध्ये अचानक सुरू झालेला 38 अंश से.पेक्षा जास्त ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात.

स्वाईन फ्लू वरील उपचार

स्वाईन फ्लूवर ऑसेलटॅमीवीर म्हणजेच टेमिफ्लू हे औषध उपलब्ध आहे. त्याचबरोबर स्वाईन फ्लूची लागण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लसदेखील उपलब्ध आहे.

आपण रुग्णांच्या लक्षणांवरून त्यांचे (अ गट-सौम्य), (ब गट-मध्यम) व (क गट-गंभीर) अशा तीन गटांमध्ये विभाजन करतो व त्यानुसार त्यांना उपचार देतो.

गट अ- ताप 100.4 डिग्रीपेक्षा कमी, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या अशी लक्षणे दिसून येतात. या रुग्णांवर त्यांच्या लक्षणानुसार उपचार करावेत व त्यांची 24 तासानंतर पुन्हा तपासणी करून त्यांच्यामध्ये काही सुधार दिसून न आल्यास त्वरित टेमिफ्लूचे औषध सुरू करावे.

ब गट- ताप 100.4 डिग्रीपेक्षा जास्त, बाकी लक्षणे वरीलप्रमाणे पण तीव्र स्वरूपाची. अशा रुग्णास त्वरित टेमिफ्लूचे औषध सुरू करावे.

-अश्विनी कासार,

जनसंपर्क अधिकारी (क्रमश:)

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply