पाभरे धरणात सर्वाधिक, तर साळोख धरणात सर्वांत कमी पाणी
रोहे : महादेव सरसंबे
रायगडात 2021 मध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली होती. पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने या वर्षी धरण क्षेत्रातील पाणी पातळी कायम राहिली. त्यामुळे मार्च अखेरीस रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या धरण क्षेत्रांत समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू होण्यास अजूनही अडीच महिने शिल्लक आहेत.
पाटबंधारे विभागाच्या रायगड जिल्ह्यातील 28 पैकी 21 धरणांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त तर सात धरणांत 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. पाभरे (ता. म्हसळा) धरणात सर्वाधिक 88 टक्के तर साळोख (ता. कर्जत) धरणात सर्वात कमी 28 टक्के पाणीसाठा आहे.
रायगडातील धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा
धरण तालुका पाणीसाठा
फणसाड मुरुड 49 टक्के
वावा तळा 78 टक्के
सुतारवाडी रोहा 78 टक्के
आंबेघर पेण 68 टक्के
श्रीगाव अलिबाग 44 टक्के
कोंडगाव सुधागड 77 टक्के
घोटवडे सुधागड 57 टक्के
ढोकशेत सुधागड 59 टक्के
कवेळे सुधागड 56 टक्के
उन्हेरे सुधागड 72 टक्के
कार्ले श्रीवर्धन 78 टक्के
कुडकी श्रीवर्धन 80 टक्के
रानीवली श्रीवर्धन 72 टक्के
पाभरे म्हसळा 88 टक्के
संदेरी म्हसळा 86 टक्के
वरंद महाड 51 टक्के
खिंडवाडी महाड 80 टक्के
कोथुर्डे महाड 41 टक्के
खैरे महाड 60 टक्के
साळोख कर्जत 28 टक्के
अवसरे कर्जत 50 टक्के
भिलवले खालापूर 54 टक्के
कलोते मोकाशी खालापूर 70 टक्के
डोणवत खालापूर 46 टक्के
मोरबे पनवेल 38 टक्के
बामणोली पनवेल 51 टक्के
उसरण पनवेल 67 टक्के
पुनाडे उरण 49 टक्के