Breaking News

महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे : डॉ. चौतमोल

पनवेल : प्रतिनिधी

महिलांनी एकत्र येत उद्योग करून स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे मत महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी बुधवारी (दि. 13) येथे केले. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरी समृद्धी उत्सव कार्यक्रमात त्या बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करीत होत्या. पनवेल महापालिकेच्या वतीने बुधवारी सकाळी 11 वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बचत गटातील महिलांसाठी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहर समृद्धी उत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास महापौर डॉ. चौतमोल यांच्यासह नगरसेविका विद्या गायकवाड, राजश्री वावेकर, उपायुक्त संध्या बावनकुळे आणि बँकचे अधिकारी उपस्थित होते. महिलांनी स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता असल्याने बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन महापौरांनी त्यांना केले. या कार्यक्रमात बँक अधिकार्‍यांनी महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. स्टेप ऑन या संस्थेच्या प्रतिनिधींनीही महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी बचत गटांना फिरता निधीचे वाटप करण्यात आले. स्वयं रोजगारासाठी बँकेकडून कर्जाचे  वाटप करण्यात आले. कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणार्‍यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply