Friday , June 9 2023
Breaking News

महिला ठरवणार रायगडचा खासदार

अलिबाग : प्रकाश सोनवडेकर

नुकत्याच झालेल्या मतदार नोंदणीनुसार रायगड लोकसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या 31 हजार 694ने जास्त आहे. त्यामुळे रागयडचा खासदार कोण असेल, हे महिला ठरविणार आहेत.

रायगड लोकसभा मतदासंघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड हे रायगड जिल्ह्यातील चार आणि दापोली व गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मोहीम सुरू होती. 31 जानेवारी 2019 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार रायगड लोकसभा मतदारसंघात 16 लाख 39 हजार 162 मतदार आहेत. त्यात 8 लाख 3 हजार 72 पुरुष; तर 8 लाख 34 हजार 766

महिला मतदारांची संख्या आहे. या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा 31 हजार 694ने जास्त आहे. 

रायगड मतदारसंघात 2 हजार 693 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यातील एक हजार 939 ग्रामीण आणि 754 शहरी भागात आहेत. त्यापैकी 24 केंद्र क्रिटीकल आहेत. 

रायगड लोकसभा मतदार संघात 28 मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल आहे.  छाननी 5 एप्रिल रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 एप्रिल आहे. मतदान 23 एप्रिल रोजी; तर 23 मे मतमोजणी होईल.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply