Breaking News

आमदार शरद सोनावणे शिवसेनेत

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार  शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेला धक्का बसला असून, विधानसभेतील मनसेची पाटी कोरी झाली आहे. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आमदार सोनावणे यांनी सोमवारी (दि. 11) शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

2009मध्ये मनसेचे 13 आमदार होते, मात्र 2014मध्ये हा आकडा एकवर आला. शरद सोनावणे यांनी जुन्नरमध्ये विजय मिळवत मनसेची लाज राखली होती, पण आता मनसेचा हा एकमेव आमदारदेखील शिवसेनेत गेल्यामुळे मनसेचा विधानसभेत एकही सदस्य नाही. सोनावणे हे पूर्वी शिवसेनेत होते. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी मनसेत प्रवेश केला होता.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply