Breaking News

हिंगणघाटच्या आरोपीला कठोर शिक्षा द्या

कर्जतमधील डिकसळ ग्रामस्थांची एकमुखी मागणी

कर्जत : बातमीदार

हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जाळणार्‍या नराधमालाही पेट्रोल टाकून जाळले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया डिकसळ येथील श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली. कर्जत तालुक्यातील डिकसळ ग्रामस्थांनी कँडल मार्च काढून या प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून हल्ला करण्यात आला होता. त्यात तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी माता रमाई महिला मंडळ, शांतीदूत मंडळ आणि पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने डिकसळ येथील  शांतीनगर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ महिला हिराताई हिरे, माजी उपसरपंच तनुजा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य भारती पाटील, भास्कर लोंगले, पोलीस पाटील सरिता शेळके यांच्या हस्ते पीडितेच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले. अ‍ॅड. उत्तम गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. कोर्टाने हे प्रकरण जास्त दिवस लांबवू नये आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा जाहीर करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी हिराताई हिरेे यांनी या वेळी केली. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.  आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, अशा घोषणा देत कँडल मार्च काढण्यात आला. त्यात पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, किशोर गायकवाड, ज्येष्ठ नागरिक तुकाराम गायकवाड, तसेच रमेश गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, महेंद्र ठोंबरे, उत्तम ठोंबरे, डॉ. संतोष सदावर्ते, पंकज बुंधाटे, हेमंत कोंडीलकर, जीवक गायकवाड, सचिन गायकवाड, निखिल गायकवाड, प्रशिक गायकवाड, कल्पेश गायकवाड, शैलेश हिरे, रमेश ताकसांडे, संगीता गायकवाड, रंजना गायकवाड, रेखा गायकवाड, पुष्पलता गायकवाड, गुलाब गायकवाड, मोनिका गायकवाड, रेखा गवळे यांसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply