लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार
उरण : वार्ताहर
न्हावा-शिवडी सेतू प्रकल्पामध्ये जे मच्छीमार बांधव बाधित आहेेत त्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि वेळोवेळच्या पाठपुराव्याला यश आले असून, 1650 मच्छीमार बांधवांना नुकसानीपोटी मोबदला देण्यात आला. एकत्रित 22 कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून वाटप करण्यात आले. याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानण्यात आले आहेत.
कामगार नेते तथा सेतू प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, जयवंत देशमुख, विशाल कोळी, प्रमोद कोळी, नंदकुमार कोळी, संजीव कोळी, राजकिरण कोळी आदींनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे त्यांनी केलेल्या बहुमोल कार्याबद्दल धन्यवाद देऊन आभार मानले. उर्वरित कामकाजही आपण अजून जास्त गतीने आणि लवकरात लवकर पूर्ण करू, अशी ग्वाही या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली.