Breaking News

आय लव्ह पनवेल अक्षर मुद्रांचे अनावरण

पनवेल : प्रतिनिधी

गावासाठी काही तरी करायचे आहे म्हणून असा मॉल करणे हे धाडसाचे असते असे पनवेल महापालिकचे आयुक्त गणेश देशमुख यांनी ओरॉयन मॉल पनवेल येथे आय लव्ह पनवेल या अक्षर मुद्रांचे अनावरण करताना शनिवारी (दि. 16) सांगितले.

या कार्यक्रमास सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, मंगेश परूळेकर आदी उपस्थित होते.

आय लव्ह पनवेल या घोषवाक्याचे आज अनावरण करून पनवेलकरांना अभिमान वाटावा अशा जागेची शहरात भर पडली आहे. पनवेल म्हणून अभिमान वाटावा या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि महापालिका काम करीत आहे. त्या अनुषंगाने अशा जागा वाढत राहाव्यात आणि खरोखर बाहेरून येणार्‍यांनी पनवेलच्या प्रेमात पडावे, असे शहर निर्माण करण्यासाठी आपण सर्व जण काम करीत राहू या. -आमदार प्रशांत ठाकूर, सिडको अध्यक्ष   

आय लव्ह पनवेल या घोषवाक्याचे उद्घाटन करून पनवेलचे नाव मोठे व्हावे यासाठी मंगेश परूळेकर प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांनी दाखवलेल्या दिशेने पनवेल महापालिका ही काम करेल. पनवेलचे नाव हे व्यापारी पेठ म्हणूनच नव्हे; तर सर्वार्थाने एक स्मार्ट सिटी म्हणून व्हावे यासाठी पनवेल महापालिका काम करेल. -परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल मनपा

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply