Breaking News

जेएनपीटीत दक्षता घेण्याच्या संजय सेठी यांच्या सूचना

ऑफिसरच्या आदेशानेच परदेशी जहाजांना बंदरात परवानगी

उरण : प्रतिनिधी

रोनाबाबतच्या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याच्या दक्षतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. बंदरात कोरोना दाखल होणार नाही याची दक्षता पीएचओ घेत असल्याचेही जेएनपीटीचे कॉन्झरवेटर कॅप्टन अमित कपूर यांनी सांगितले. या बैठकीत प्रशासनाचे विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जेएनपीटी बंदरात जगभरातील देशातील मालवाहू जहाजे ये-जा करीत असतात, मात्र जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर जेएनपीटी प्रशासनानेही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. त्याची दखल घेऊन कोरोना विषाणू पसरल्यानंतर चीनमधून येणार्‍या जहाजांना बंदरात जेएनपीटीने अनेक निर्बंध घातले आहेत. जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ ऑफिसरच्या (पीएचओ) आदेशानंतरच जहाजांना बंदरात येण्याची परवानगी दिली जाते. मात्र जहाजावरील एकाही कर्मचार्‍याला बंदरात उतरू दिले जात नाही. दिवसात किती जहाजे आली, किती रवाना झाली आणि जहाजावरील किती कर्मचार्‍यांची तपासणी केली त्याचा संपूर्ण तपशीलही केंद्रीय आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येतो, अशी माहिती जेएनपीटीच्या अधिकार्‍यांनी दिली. कोरोनाबाधित देशांचा तपशील जेएनपीटी प्रशासनाकडे उपलब्ध आहे. अशा कोरोनाबाधित देशांतून येणार्‍या जहाजांना 15 दिवस बंदरात येण्यास परवानगी दिली जात नाही. 15 दिवसांनंतर जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ ऑफिसरच्या (पीएचओ) आदेशानंतरच जहाजांना बंदरात येण्याची परवानगी दिली जाते. असेच कोरोनाबाधित देशातून अमोनिया रसायनाने भरलेल्या इराणच्या जहाजाला जेएनपीटीने बंदरात येण्यास परवानगी नाकारली आहे. जहाजावर तुर्की व भारतीय कर्मचारीही आहेत. परवानगी नाकारण्यात आलेले इराणी जहाज मागील 10-12 दिवसांपासून समुद्रात नांगरून ठेवण्यात आल्याची माहिती जेएनपीटी अधिकार्‍यांनी दिली. 15 दिवसांनंतर जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ ऑफिसरच्या (पीएचओ) आदेशानंतरच हे जहाज बंदरात लँडिंग करू शकेल, अशी माहिती जेएनपीटीचे कॉन्झरवेटर कॅप्टन अमित कपूर यांनी दिली. बंदरात मालवाहू जहाजे शेड्यूलप्रमाणेच दाखल होत आहेत. त्यामुळे आयात-निर्यात व्यापारात फारसा परिणाम झाला नसल्याचेही कॅप्टन अमित कपूर यांनी सांगितले.

बंदरात येणार्‍या मालवाहू जहाजांची संख्या कमी झाली आहे. पाच कंपन्यांच्या जहाजांनी शेड्यूल ब्रेक केल्याची माहिती जेएनपीटीच्या संबंधित अधिकार्‍यांनी दिली. भारत मुंबई कंटेनर टर्मिनल बंदरावर कोरोनाचा परिणाम झाला नसल्याचा दावा बंदराचे एचआर अवधूत सावंत यांनी केला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply