Breaking News

पाताळगंगेच्या पाण्यावर जलपर्णीचे जाळे

मोहोपाडा : प्रतिनिधी

पाताळगंगा नदी किनार्‍यावरील श्री गजानन महाराज मंदिराजवळील नदिपात्रात दोन एकरपेक्षा जास्त जलपर्णीचे जाळे पसरले आहे. यामुळे पाताळगंगा नदीवर मासेमारी करून जीवन जगणार्‍या आदिवासी व भोई बांधवात नाराजी दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून नदीतील पाण्यावर जलपर्णीचे रान माजल्याने जणूकाही खेळाचे मैदान असल्याचे वाटू लागले आहे.पाण्यावर असलेली ही जलपर्णी पाहून जंगल निर्माण झाल्याचा भास पाहणार्‍यांना होत आहे.

दरम्यान, गजानन महाराज मंदिराजवळ पाताळगंगेतील पाणी अडविले जाते, परंतू जलपर्णी वनस्पतीमुळे पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होत असून या जलपर्णीत लहान जीव मृत होवून अडकून बसतात.

या भागात जलपर्णी वनस्पती पाण्यात पसरल्याने नदी न वाटता एखादे मोठे खेलाचे मैदान असल्याचा भास होत आहे. यामुळे मासेमारी व्यवसाय करणार्‍यांना या जलपर्णीमुळे मासेमारी करणे धोक्याचे झाले असून कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कठिण होऊन बसला असल्याचे आदिवासी बांधवांनी बोलताना सांगितले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply