Breaking News

अनावश्यक गर्दीवर नजर; खोपोलीत निर्बंध पाळण्यासाठी सूचना व आवाहन

खोपोली : प्रतिनिधी : कोरोनाला रोखण्यासाठी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूला खोपोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मात्र दुसर्‍या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 12च्या दरम्यान खोपोली बाजारात लोकांची अनावश्यक गर्दी झाल्याचे चित्र होते. यातील फारच कमी लोक अतिमहत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडले होते, तर बहुतांश नागरिक काय चालले आहे? बाजारातील स्थिती काय आहे? हे बघण्यासाठी घराबाहेर पडल्याचे दिसले. या अनावश्यक गर्दीला गस्तीवरील पोलीस पथकाने जाब विचारल्यावर काही वेळात गर्दी ओसरली.

दुसरीकडे सोमवारी भाजीपाला बाजारात आठ-दहा दुकाने, मुख्य बाजारात चार-पाच किराणा दुकान, दूध विक्रीची काही दुकाने व काही औषधी दुकाने व दवाखाने वगळता अन्य सर्व दुकाने व आस्थापने बंदच होती. अत्यावश्यक सेवा म्हणून शहरातील दोन पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, 31 मार्चपर्यंत जमावबंदी आणि सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने याचा परिणाम स्वरूप मुंबई-पुणे महामार्ग व एक्स्प्रेस वेवर किरकोळ प्रमाणात खासगी वाहने जात येत होती.

कोणतेही महत्त्वाचे काम नसताना उगाचच घरा बाहेर पडणार्‍या व बाजार, तसेच सार्वजनिक रस्ते तथा चौकात उभे राहणार्‍या टोळक्यांना आवर घालण्यासाठी प्रशासन व पोलिसांकडून कडक उपाययोजना केली जात आहेत. पोलीस गस्ती पथक व नगर परिषद पथकाकडून नागरिकांनी सहकार्य करण्याबाबत वारंवार सूचना व आवाहन करण्यात येत आहे.

राज्यात जमावबंदी आदेश लागू झाले आहेत. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. नागरिकांनी व औद्योगिक क्षेत्राकडून याचे पालन होण्याची अपेक्षा आहे. याचे उल्लंघन करणार्‍यांवर  प्रशासनकडून कडक कारवाई केली जाईल.

-इरेश चप्पलवार ,तहसीलदार, खालापूर

अत्यावश्यक गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. या काळात पाच व त्याहून अधिक नागरिकांनी एकत्र येण्यावर बंदी आहे. चौकात किंवा  रस्त्यांवर विनाकारण भटकंती करणार्‍यांना कडक ताकीद दिली जात आहे. आवश्यकता पडल्यास नियमानुसार कारवाई ही केली जाईल. नागरिकांनी पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे.

-डॉ. रणजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी फोटो आहेत.

औद्योगिक क्षेत्राबाबत स्पष्टता नाही खोपोली व खालापूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी व उत्पादन सुरू ठेवण्याबाबत स्पष्टता नसल्याने सोमवारी येथील अनेक कंपन्या नियमितपणे सुरू राहिल्या, मात्र बहुतांशी कामगारांनी स्वतःहुन घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने येथील उपस्थित अत्यंत कमी होती. याबाबत खोपोली व खालापूर इंडस्ट्री असोसिएशनकडून प्रशासकीय आदेशानुसार पालन होण्याची गरज कामगार क्षेत्राकडून व्यक्त केली जात आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply