Breaking News

तक्का येथे शासकीय दाखले वाटप शिबिर

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त

जून महिन्यांमध्ये शाळा सुरू होतात. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरीता लागणारे दाखले गोळा करण्यासाठी पालकांची चांगलीच धावपळ होते. याअनुषंगाने भारतीय जनता पक्ष तक्का व एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीने आधारकार्ड व शासकीय दाखले वाटप शिबिर बुधवारी (दि. 11) आयोजित करण्यात आले होते. तक्का मराठी शाळेत आयोजित या शिबिराला पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.

तक्का येथील मराठी शाळेत भारतीय जनता पक्ष तक्का व एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीने आणि भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या माध्यमातून आधारकार्ड व शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरीता किंवा सरकारी कामांसाठी आधारकार्ड आणि शासकीय दाखल्यांची गरज भासते अशावेळी दाखले गोळा करण्यासाठी नागरिकांची धावपळ होते. या पार्श्वभुमीवर हे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, याचा लाभ परिसरातील अनेक नागरिकांना घेतला.

या वेळी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, एकविरा युवक मंडळाचे अध्यक्ष संजीव बहिरा, कार्याध्यक्ष संदीप खुटकर, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, संदीप बहिरा, युवानेते प्रतिक बहिरा, प्रभाग क्रमांक 20 अध्यक्ष रघुनाथ बहिरा, अशोक आंबेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भारतीय जनता पक्ष तक्का आणि एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीने सातत्याने राबवण्यात येणार्‍या उपक्रमांचे कौतुक केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply