खालापूर : चौक ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीला 10 बेडचे कोविड उपचार केंद्र असून, त्याची व रुग्णालयाची आमदार महेश बालदी यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधत आढावा घेतला. माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, चौक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, डॉ. एस. सी. खोलवडीकर, डॉ. सुशील चौरे, युवराज दैन, भाजपचे चौक जिल्हा परिषद अध्यक्ष गणेश मुकादम, माजी उपसरपंच गणेश कदम आदी उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper