Breaking News

कोरोना ः खबरदारी हाच उत्तम पर्याय!

चीनमधून उदयास आलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना व्हायरस जीवघेणा ठरत आहे. या प्राणघातक विषाणूमुळे होणार्‍या आजारावर आजतागायत कोणताही अधिकृत उपचार शोधला गेला नाही. तसेच या व्हायरसवर ठोस उपाय म्हणून कोणतेही लसीकरण उपलब्ध नाही. जर एखादा व्यक्तीला कोरोनाची लागण झाली, तर या गंभीर आजारावर कोणताच ठोस उपचार नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून कसे दूर राहता येईल याबाबतची काळजी घेणे हाच एकमात्र उपाय आहे.

कोरोना व्हायरसची लक्षणे : कोरोना विषाणूची लक्षणे सामान्य असतात. जरी एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण झाली नसेल तरीही या व्हायरसशी संबंधित असलेली लक्षणे त्या व्यक्तीत दिसू शकतात. सर्दी, डोकेदुखी, खोकला, पित्त, घसा खराब होणे, ताप, अशक्तपणा, श्वसनाचा त्रास, न्यूमोनिया, ब्रॉन्कायटीस यांसारखे गंभीर आजार होणे ही कोरोनाची लक्षणे आहेत.

कंठात सतत ओलावा ठेवणे : तुमचा घसा आणि कंठ सतत ओला ठेवा. जास्तीत जास्त पाणी पित राहा. जर तुम्ही तहानलेले असाल आणि वेळेवर पाणी पिण्याचा कंटाळा केला, तर तुमचा घसा कोरडा होईल आणि कोरड्या घशातच कोरोना प्रवेश करतो. त्यामुळे जेवढे शक्य होईल तितके पाणी पित राहा.

उकळलेले गरम पाणी पिणे : साध्या पाण्याऐवजी उकळलेले गरम पाणी पित राहा. पाण्याचे मोठमोठे घोट घेऊ नका. जसे चहा पितो तसेच एक एक घोट घेत गरम पाणी प्या.

मांसाहार टाळा : कोरोना हा जीवघेणा व्हायरस प्राण्यांमधून माणसांत प्रवेश करीत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी मांसाहार करू नका. जोपर्यंत या व्हायरसचा संसर्ग कमी होत नाही तोपर्यंत नॅानव्हेज खाणे टाळा.

व्हिटॅमिन ’सी’चे सेवन : तुमच्या रोजच्या नियमित आहारात संत्रे, स्ट्रॉबेरी, कोबी यांसारख्या फळभाज्यांचा समावेश करा. कारण या फळभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ’सी’चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. व्हिटॅमिन ’सी’चे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

बी कॉम्प्लेक्स टॅबलेट : व्हिटॅमिन ’सी’बरोबरच झिंक आणि ’बी’ कॅाम्प्लेक्सच्या टॅबलेटही तुम्ही तुमच्या डाएटसोबत घ्या. या टॅबलेटनेही तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्हाला आजार होण्यापासून वाचवते.

सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा : कोरोना व्हायरस अनेक देशांमध्ये वेगाने पसरला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका. बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ पाण्याने धुवा. माखलेल्या हाताने चेहरा, नाक, डोळे आणि तोंडाला स्पर्श करू नका.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply