कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाने मदत वाटप करण्यात आघाडी घेतली असून सर्वत्र भाजप कार्यकर्ते गरजूंना मदत करण्यात आघाडीवर आहेत. उमरोली जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष केशव तरे यांनीदेखील दहिवली ग्रामपंचायतीमधील गरजू आणि गरीब लोकांना त्यांच्या घरी जाऊन मदत पोहचविली आहे.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्या गोरगरिबांचे जगणे मुश्कील झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार भाजप उमरोली जिल्हा परिषद वॉर्ड अध्यक्ष केशव तरे यांनी स्वखर्चाने दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी कुटुंबांना तांदूळ, मूगडाळ, चहा, साखर, कांदे, मीठ, बिस्कीट इत्यादी वस्तूंची मदत केली. भाजप कार्यकर्ते प्रशांत शहाणे आणि मालेगाव भाजप बूथ अध्यक्ष अर्जुन भोईर घरोघरी जाऊन गरजूंना मदत पोहचवत आहेत.