Breaking News

आदिवासींचे उत्पन्नाचे साधन रानमेवा कोरोनामुळे दुर्मीळ

मोहोपाडा : प्रतिनिधी

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उन्हाच्या चटक्यापासून थकवा कमी व्हावा, यासाठी निसर्गाने या ऋतूमध्ये रसाळ फळे व रानमेव्याची निर्मिती केली असावी. यामुळे दरवर्षी विविध बाजारात पेठांत जंगलातील रानमेवा दाखल होत असतो. मात्र या वर्षी कोरोनासारखे संकट आल्यामुळे आणि त्यातच संचारबंदीमुळे आदिवासींचे हे उत्पन्नाचे साधन रानमेवा हा दुर्मीळ झाला आहे.

उन्हाळ्याचे आगमन होताच हा रानातील रानमेवा बाजारात येत असल्यामुळे यामध्ये करवंदे, कैरी, अंजीर, काजू, चिंच, जांभळे, आदी जंगलामध्ये तयार झालेला रानमेवा मोहपाडा, खोपोली, चौक या बाजारात दाखल होत असत या रानमेव्यामुळे आदिवासी समाजाला रोजगार मिळत असतो. तसेच रानातील काळी मैना अजून तयार झाली. नसून हिरवीगार करवंदे म्हणून हिचा ठेचा म्हणून स्वयंपाक करण्यासाठी दैनंदिन जीवनात वापरत उपयोग होत आल्याचे महिला वर्गाकडून सांगण्यात येत आहे. मात्र या वर्षी जंगलातील रानमेवा मिळणे दुर्मीळ झाल्याचे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.                                                                                     

उन्हाळ्यात रानमेव्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. असह्य करणार्‍या उन्हामध्ये अगदी पटकन तोंडात टाकता येणार्‍या आणि खायला रुचकर असणार्‍या या रानमेव्यांना लहान मुलांपासून मोठ्या मंडळी सर्वांचीच मागणी असते. शरीराला थंडावा देणारा आणि औषधी गुणधर्म असणारा रानमेवा मात्र कोरोनामुळे या वर्षी बाजारपेठेत दाखल न झाल्यामुळे या मधूर रानमेव्यांची चव यंदा प्रत्येकाला मिळेलच असे नाही. -दुर्गम भागात राहणार्‍या आदिवासी बांधवांचे उत्पन्नाचे साधन म्हणून डोंगरातील रानमेवा असून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पटकन तोंडात टाकता येणारा तसेच शरीराला आणि मनाला गारवा देणार्‍या या रानमेव्याला अधिक मागणी दिसत आहे. मात्र संचारबंदीमुळे जंगलातील रानमेवा तयार झाला असून त्याची विक्री होत नसल्यामुळे या रसाळ फळांची चव सध्या दुर्मीळ झाली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply