Breaking News

श्री साई नारायणबाबा मंदिराच्या वतीने पेपरविक्रेते, रिक्षाचालकांना धान्याचे वाटप

पनवेल : वार्ताहर

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदतीचा हात म्हणून श्री साई नारायणबाबा मंदिर, पनवेल रेल्वे स्टेशनच्या वतीने बुधवारी पनवेल परिसरात पेपर विक्री करणार्‍या काही विक्रेत्यांसह गरजू रिक्षाचालक आणि गरजवंतांना धान्याचे वाटप करण्यात आले. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पेपर विक्रेते आपला व्यवसाय करीत असतात. परंतु लॉकडाऊनमुळे पेपर विक्री सुद्धा बंद पडली होती. या व्यवसायावर अनेकांची घरे अवलंबून आहेत. अशांना मदतीचा हात म्हणून पनवेल मिडीया प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष गणेश कोळी व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष संजय कदम यांनी ही गोष्ट श्री साई नारायणबाबा मंदिराचे पदाधिकारी राम थदानी यांना सांगितली. त्यांनी तातडीने या पेपर विक्रेत्यांसह रिक्षा चालक व गरजवंतांना धान्य देण्याचे मान्य करून त्यांचे वाटप डॉ. अर्चना राम थदानी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर नियमितपणे गरजू लोकांसाठी धान्यवाटप, अन्नवाटप व इतर वैद्यकीय मदतसुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती राम थदानी यांनी दिली.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply