नवी दिल्ली : केंद्र सरकारने आपल्या 30 लाख कर्मचार्यांसाठी खूशखबर दिली आहे. त्यांच्यासाठी दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला असून, तो लगेचच कर्मचार्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2019-20मधील बोनस मंजूर केला आहे. हा बोनस 3,737 कोटी एवढा असून, त्याचा फायदा 30 लाख 67 हजार गैर-राजपत्रित कर्मचार्यांना होणार आहे, असे जावडेकर म्हणाले. बोनसची ही रक्कम कर्मचार्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी)द्वारे वळती केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा बोनस दसर्याच्या आधीच दिला जाणार आहे.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …