Breaking News

खोपोलीतील शिवस्मारक सुशोभीकरण काम रखडले; पालिकेचे दुर्लक्ष

खोपोली : प्रतिनिधी

खोपोलीतील शीळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराचे सुशोभीकरणच्या कामासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या आमदार निधीच्या माध्यमातून 25 लाखाहून अधिक निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीत अधिक भर टाकून पालिकेच्या माध्यमातून हे सुशोभीकरणचे काम सुरू झाले. मात्र मागील काही महिन्यांपासून काम बंद असून  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व येथील अन्य बाबींची दुरावस्था होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या ठिकाणी स्टाईल्स निघाल्या असून , सर्वत्र अस्वच्छता वाढत आहे. पुतळा समोरील ताम्रपत्र उघडले असून  त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ जमा झाली आहे. येथे लावण्यात आलेल्या कारंज्या व रंगीत रोषणाई अनेक महिन्यांपासून बंद असून , पालीकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.एकीकडे सुशोभीकरणासाठी लाखोंचा निधी वारंवार खर्च केला जात असून प्रत्येक वेळी पूर्वी लावण्यात आलेली सामुग्री काढून नवीन सामुग्री लावण्यात येत आहे .

खोपोलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दोन्ही परिसराचे सुशोभीकरणचे काम मागील दीड वर्ष सुरू असून  काम सुरू असतानाच दीड वर्षापूर्वी करण्यात आलेली कामे आत्ता पुन्हा नव्याने करण्याची वेळ पालिकेवर आली आहे.

शहरातील हे दोन्ही पुतळा सुशोभीकरणसाठी मागील पाच सात वर्षांत एक कोटीहून अधिक निधी खर्च पडूनही अपेक्षित असलेली व दर्जेदार कामे केली जात नसल्याने महापुरुषांची ही दोन्ही स्थळे वारंवार निकृष्ट कामे करून पालिका निधीचा पद्धद्दशीरपणे गैरवापर करण्याचे केंद्र बनले असल्याचा संशय शहरातील शिवभक्त व भीम अनुयायांनी व्यक्त केला आहे.

ठेकेदारांच्या काही तांत्रिक कारणांमुळे वर्तमान स्थितीत शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे  काम बंद आहे  मात्र लवकरच हे काम सुरू होईल व नागरिकांच्या मनातले व अपेक्षित असे सुशोभीकरण पूर्णत्वास येईल .तसेच तुटलेल्या  स्टाईल्स व येथील अन्य त्रुटी तातडीने दुरुस्त करण्यात येतील.

-अनुप दुरे-पाटील, मुख्याधिकारी खोपोली

शिवस्मारकाचे सुशोभीकरण काम अत्यंत उच्च दर्जाचे व्हावे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. हे काम तातडीने पूर्णत्वास जाण्यासाठी पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी विचारणा केली जाते.

-डॉ. सुनील पाटील, शिवसेना नेते, खोपोली

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply