Breaking News

कर्जत पोलीस ठाण्यातर्फे दोन लाख 24 हजारांचा दंड वसूल

कर्जत : प्रतिनिधी – शासन आणि प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच रहा सुरक्षित रहा, असे वारंवार ओरडून सांगत आहेत. मात्र काही विनाकारण, बिनकामाचे नागरिक आजही आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन सर्रास बाहेर पडतात. अशा चालकांवर आणि वाहन जप्त करून कर्जत पोलिसांनी कारवाई केली असून दोन लाख 24 रुपयांचा दंडही वसूल केला आहे. पोलीस वाहने जप्त करून दंडही घेत असल्याने आता रस्त्यावर फिरणार्‍या वाहनांची संख्या काही प्रमाणात कमी झालेली पाहायला मिळत आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या सूचनेनुसार आणि कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत हे तालुक्याचे ठिकाण असल्याने पोलिसांनी कर्जत शहरात येणार्‍या श्रीराम पुलावर चेक पोस्ट तयार केले असून त्याठिकाणी सहाय्यक पोलीस निरिक्षक गोविंद पाटील, सहायक फौजदार विलास शेलार, पोलीस हवालदार सुरेश पाटील, महिला पोलीस कर्मचारी मनाली शिंदे, गणेश पाटील तर दुसरे

चेक पोस्ट चार फाटा येथे तयार केले असून त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष बिडकर, पोलीस शिपाई गजानन केंद्रे, अंकुश म्हात्रे, पोलीस नाईक अमोल धायगुडे, होमगार्ड मंजुनाथ कुंभार हे शहरात येणार्‍या गाड्याची तपासणी करत आहेत. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त विनाकारण खाजगी वाहने रस्त्यावर फिरणार्‍या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. यामध्ये चालकाची वाहनेही जप्त केली जात आहेत. कर्जत पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण फिरणार्‍या चालकाची वाहने जप्त केली आहेत. तर सुमारे 1000 हजार वाहन चालकांवर दंड आकारणी केली असून दोन लाख 24 हजार  रुपये इतकी दंड आकारणी केली आहे. कर्जत पोलिसांनी 22 मार्च ते 18 एप्रिल या लॉकडाऊन काळात ही कारवाई केली आहे. तर 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढले असल्याने हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply