Breaking News

लॉकडाऊनमध्ये ‘संवाद’चा आधार

मुंबई : प्रतिनिधी – कोरोना लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी नागरिकांना जाणवणारा मानसिक तणाव दूर करता यावा, सध्याच्या कठीण परिस्थितीत त्यांच्याशी संवाद साधून या नागरिकांचे मनोबल वाढवता यावे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1800 102 4040 या हेल्पलाईन टोल फ्री सेवेची माहिती दिली.

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने ‘प्रोजेक्ट मुंबई’ व ‘प्रफुल्लता’ या मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणार्या संस्थांच्या सहकार्याने ‘संवाद’ हा अभिनव उपक्रम 19 एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. संवाद उपक्रमाच्या अंतर्गत हेल्पलाइन क्रमांकाच्या सहाय्याने नागरिकांना समुपदेशकांशी संवाद साधता येणार आहे.

महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील 30 समुपदेशक मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत या नागरिकांशी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत संवाद साधणार असून ग्रामीण, शहरी भागातील नागरिकांचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून मदत होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांचे मानसिक आरोग्यही चिंतामुक्त ठेवण्यासाठी ‘संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश सर्व नागरिक घरात असताना त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे, हे गरजेचे आहे.

लॉकडाऊनच्या काळात केवळ शहरीच नव्हे तर दुर्गम, ग्रामीण भागातील नागरिक, आदिवासी यांचे राज्य शासनाच्या उपक्रमांतून समुपदेशन केले जाणार आहे. यासाठी सर्व विभागांनी सहकार्य केले आहे. संवाद उपक्रमामुळे नागरिकांना मानसिक आरोग्य उत्तम राहील, अशी आशा आहे.

-मनीषा वर्मा, प्रधान  सचिव, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन

असा आहे उपक्रम

महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाला ‘संवाद’च्या 1800 102 4040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून त्यांना भेडसावणार्‍या समस्या, चिंता यांचे निरसन मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधून करून घेता येणार आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील 30 मानसोपचार तज्ञ समुपदेशक विना मोबदला या सेवेद्वारे सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत मानसिक समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत. हे मानसोपचार तज्ञ समुपदेशक त्या जिल्ह्यातील असून नागरिकांची स्थानिक बोली जाणणारे आहेत. ग्रामीण भागात समुपदेशनाची सेवा देऊ इच्छिणार्‍या समुपदेशक स्वयंसेवकांनी र्ीेंर्श्रीपींशशीिीेक्षशर्लीाीांलरळ.ेीस या मेलआयडीवर संपर्क साधावा.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply