Breaking News

जेएनपीटीचा सर्वाधिक कंटेनर ट्रेन्स हाताळणीचा विक्रम

उरण ः प्रतिनिधी

जेएनपीटीने आपल्या रेल्वे गुणांकामध्ये 22.39 टक्क्यांची वाढ करीत एप्रिल महिन्यात 499 कंटेनर ट्रेन्सची हाताळणी केली. ही आजवरची एका महिन्यात केलेली कंटेनर ट्रेन्सची सर्वाधिक हाताळणी आहे. अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत येत असल्याने जेएनपीटीचे कार्य निरंतर सुरू आहे.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे एक प्रमुख कंटेनर पोर्ट असून जेएनपीटीने कोविड-19चा उद्रेक आणि लॉकडाऊन आव्हानांच्या परिणामावर मात करीत 283,802 टीईयू कंटेनरची हाताळणी केली आहे. जेएनपीटीने एप्रिल 2020मध्ये गतवर्षी एप्रिल 2019मध्ये हाताळणी केलेल्या आयात कंटेनरच्या 80 टक्के आयात कंटेनरची हाताळणी आणि एप्रिल 2019 मध्ये केलेल्या माल वाहतुकीच्या 63 टक्के माल वाहतूक केली आहे. भारत सरकारने जारी केलेल्या सुधारित लॉकडाऊन मानदंडांमुळे देशाच्या आंतरिक भागातील कारखाने सुरू झाले आहेत व त्यामुळे निर्यातीतही वाढ होत आहे. पोर्टने एप्रिल 2020मध्ये एकूण 167 जहाजांची हाताळणी केली असून पोर्टमुळे होणार्‍या टर्न अराऊंड वेळेमध्ये सुधारणा होऊन ती आता 39 तासांवरून 33 तास झाली आहे.

सर्व टर्मिनल्स, शिपिंग लाईन्स, कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस), कस्टम हाऊस एजंट्स (सीएचए), वाहतूकदार, कॉनकोर, खासगी कंटेनर ट्रेन ऑपरेटर, ट्रक वाहतूकदार, बीपीसीएल लिक्विड कार्गो जेट्टी आणि संबंधित टँक फार्म, रिकामे यार्ड चालक, फसाईसारख्या भागीदार सरकारी एजन्सी, बंदर ऑपरेशन्सशी जोडलेले प्लांट क्वारंटाइन जे या कठीण काळात बंदराला आपली कर्तव्ये पार पाडण्यास मदत करण्यासाठी वेळापत्रकानुसार कार्यरत आहेत या सर्वांच्या पाठिंब्याचा हा

परिणाम आहे.  विनाअडथळा व्यापार सुरू ठेवण्याबरोबरच कोरोना प्रकोपाचा परिणाम मर्यादित ठेवण्यासाठी जेएनपीटीने विविध उपाययोजना केल्या आहेत. जेएनपीटीने बंदरातील सर्व कंटेनर टर्मिनल्सवर शुल्क माफी देण्याच्या योजनेचा कालावधी 15 एप्रिलपासून 3 मेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली गेली. जेएनपीटीने आपल्या ग्राहकांना मदत करण्याच्या उद्देशाने केलेल्या काही सक्रिय उपायांमुळे व्यापारास दिलासा मिळाला आहे. उदा. रस्तेमार्गे व रेल्वेने वाहतूक केल्या जाणार्‍या सर्व आयात कंटेनरसाठी ड्वेल टाइम शुल्क आकारले जाणार नाही. वाहतूक पर्यायामध्ये बदल करण्यासाठी कोणतेही शिफ्टिंग शुल्क आकारले जाणार नाही. 48 तासांनंतर आयसीडी मुलुंड किंवा आयसीडी तारापूरकडे रेल्वेमार्गे वाहतूक केली जाणार्‍या डीपीडी कंटेनरसाठी 13 एप्रिलपासून कोणतेही शिफ्टिंग शुल्क आकारले जाणार नाही. कारण ते पोर्टचे विस्तारित बंदर प्रवेशद्वार म्हणून घोषित  करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply