Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण नगर परिषदेतर्र्फे सर्वेक्षण

उरण : वार्ताहर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शक सूचनेनूसार उरण नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या हद्दीतील 60 वर्षांपेक्षा अधिक असणार्‍या व्यक्ती व आजार ग्रस्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

यामध्ये गावनिहाय व वॉर्डनिहाय वय वर्षे 60 पेक्षा अधिक असणार्‍या ज्येष्ठ व्यक्ती तसेच गरोदर महिला, कॅन्सरग्रस्त, डायलिसीस वर असणारे, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षय रोग, कुष्ठरोग व हृदयरोग, दमा, अस्थमा यासारख्या गंभीर आजार असणार्‍या व्यक्तींचे नाव, गाव, मोबाइल नंबरसह सर्वेक्षण करण्यात येत आहे.

या कामी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, उरण शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उरण नगरपरिषद मुख्याधिकारी अवधूत तावडे, आरोग्य सभापती रजनी सुनील कोळी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, आरोग्य निरीक्षक महेश लवटे, कामगार आदींचे सहकार्य मिळत आहे.

उरण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येणार्‍या सर्वेक्षणाचे नोडल अधिकारी अनिल जगधनी असून या उपक्रमात सुमारे 25 कर्मचारी काम करीत आहेत. हे कर्मचारी घरोघरी जाऊन, गंभीर आजाराचे रुग्ण आहेत का, इतर काही आजारी आहेत का,  वय वर्षे 60 पेक्षा अधिक असणार्‍या व्यक्ती आजारी आहे, अशा प्रकारची चौकशी करून, माहिती गोळा करीत आहेत. त्या अनुषंगाने या उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे, अशी माहिती उरण नगरपरिषदचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply