Breaking News

एमजीएम रुग्णालयाला एक हात मदतीचा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे रक्तदान

कळंबोली : प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णामुळे रक्ताची कमतरता भासत असल्याने त्यांना तातडीने रक्त पुरवठा करता यावा म्हणून उपजिल्हा रुग्णालय पनवेल व एमजीएम कामोठे रुग्णालयानी रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. या आवाहनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळानी पुढे येत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात 60 रक्तादात्यानी

रक्तदान केले.

कोविड 19 विरोधात लढताना शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. डॉक्टर, नर्स व त्यांचे सहकारी योद्धया प्रमाणे लढताना कोरोना विषाणूसोबत दोन हात करत आहेत. पण यासाठी जनतेच्या सहकार्याची आवश्यकता आहे. पनवेल पालिका हद्दीसह ग्रामीण भागात कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पनवेलमध्ये 110 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 1600 च्यावर क्वारंटाइन केले आहेत. रायगड जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय पनवेल व एमजीएम रूग्णालय कामोठे ही कोविड19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आली आहेत या रुग्णालयात कोरोना रूग्ण उपचार घेत असून त्याबरोबर अन्य रुग्णावरही उपचार सुरू आहेत.

देशभरात सध्या लॉकडाऊन असल्याने विविध ब्लड बँक बंद असल्याने रुग्णालयात रक्ताची कमतरता भासू लागली आहे त्यामुळे कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाने रक्ताची तातडीने गरज भासत असल्याने विविध सामाजिक संस्थांकडे पत्रव्यवहार करून आम्हाला रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तपुरवठा करा अशी मागणी केली आहे. त्यानुसार त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत खांदा कॉलनीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाने बुध्द जयंतीचा सामाजिक कार्यक्रम म्हणून तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत सोशल डिस्टन्सिंग ठेवत जवळ जवळ 55 ते 60 रक्तदात्यानी रक्तदान केले. एमजीएम रुग्णालयाचे डॉक्टर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाच्या या दोघांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला. एमजीएमच्या वतीने या मंडळाचे आभार मानण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष श्याम लगाडे,  सचिव महेंद्र कांबळे खजिनदार संदिप भालेराव कार्याध्यक्ष महादेव वाघमारे रमेश गायकवाड सदस्य अनिकेत भंडारे गोपीचंद खरात, संदिप डोंगरे  मुकुंद रोटे, पंकज कांबळे तसेच या कार्यक्रमाला श्री साई सदन सोसायटीचे अध्यक्ष श्याम डिंगळे तसेच साई कुपा क्लीनिक उपलब्ध करून देणारे डॉ. अमित शिणगारे यांनी आपले सामाजिक योगदान दिले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply