Breaking News

वायू प्रदूषण करणार्‍या कारखान्यांवर कडक कारवाई करावी -संजय भोपी

कळंबोली : प्रतिनिधी

तळोजा औद्योगिक विभागातील कारखान्यातून मोठ्या प्रमाणात विषारी व विघातक वायू  सोडण्यात येत आहे. त्यामुळे वायु प्रदुषण वाढले असून त्याचा आसपासच्या परिसरातील  नागरिकांना मोठा त्रास होत असून त्यांचे जीवन नरक यातना भोगत आहे त्यांचे राहणे अशक्य झाले आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना दमा न क्षयरोगांना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा विषारी व विघातक वायू सोडणार्‍या कारखान्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभापती संजय भोपी यांनी  प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे.

सध्या कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य रोगाने जगभरात थैमान घातले असून यात भर म्हणून या औद्योगिक विभागातील कारखाने लॉकडाऊनचा फायदा घेवून रात्रीच्या वेळी विघातक व विषारी वायू सोडत आहेत. कारखान्यातून सोडण्यात येणार्‍या विषारी वायुच्या उग्र वासाने स्थानिक व परिसरातील नागरिकांचे जीवन नरक केले आहे. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून छातीत जळजळ होत आहे. दम्यासारखे आजार असणार्‍यांना तर खूपच त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना जीवन नकोसे झाले आहे. लहान बाळांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतांना दिसून येत आहे.

कोरोना लॉकडाऊनमध्ये संपुर्ण कारखाने बंद असताना या विभागातील नागरिकांची वायू व जल प्रदुषणापासून सुटका झाली होती. पण आता या विभागातील काही कारखाने चालू करण्यात आले असून या कारखान्यातून सोडण्यात येणार्‍या विषारी वायुने नागरिकांचा जीव गुदमरून जात आहे. तेव्हा तळोजा औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांमधून सोडण्यात येत असलेल्या विषारी व दुर्गधीयुक्त वायू बाबत गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन संबंधित कंपनींवर कडक कारवाई करून आसपासच्या परीसरातील स्थानिकांना होत असलेल्या आरोग्यविषयक त्रासातून दिलासा दयावा, अशी विनंती पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी लेखी निवेदनाने प्रादेशिक अधिकारी महराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे केली आहे.

या बाबतचे निवेदन पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ (नवी मुंबई) यांनाही केली आहे. त्याच बरोबर काही कारखान्यानी कंपन्या चालू करण्याचे परवाने घेतले नसून असा अनेक कंपन्या चालू आहेत. शासनाचे लॉकडाऊनचे ऩियम धाब्यावर बसवून कारखाने चालू करण्यात आले आहेत. असा कंपन्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही भोपी यांनी केली आहे.

-कोरोना महामारीत वायु प्रदूषणाचेही संकट कोरोनाच्या महामारीत जीव मुठीत घेवून असलेले नागरिक घरातच राहून शासनाला सहकार्य कपत सुरक्षित आहेत. असा महाभयंकर संकटात त्यांना विषारी व दुर्गधीयुक्त वायू प्रदुषणामुळे होणार्‍या आजारांवर उपचार करण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषकरून लहान मुले व वयस्कर नागरीक यांना उपचारासाठी घराबाहेर नेणे हे जोखमीचे ठरत असून त्याना कोरोना या रोगाची लागण होण्याची दाट भिती नागरीकांच्या मनात निर्माण झाली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply