Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून सैनिकी शिक्षणासाठी 50 हजाराची आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सांगली येथे सैनिकी शिक्षण घेत असलेल्या पनवेलमधील आयुष गुरुप्रसाद मार्गी याला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते आयुषच्या पालकांकडे गुरुवारी (दि. 22) सुपूर्द करण्यात आला.

पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथील 16 वर्षीय आयुष मार्गी हा सांगली जिल्ह्यातील बहादूरवाडी येथील आदर्श करिअर अकॅडमीमध्ये अकरावी सायन्स व आर्मीचे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नगरसेविका दर्शना भोईर यांच्यामार्फत त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंडळाच्या माध्यमातून आयुषला शिक्षणासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. या बहुमोल मदतीबद्दल मार्गी कुटुंबीयांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, मंडळाचे सचिव परेश ठाकूर तसेच नगरसेविका दर्शना भोईर यांचे आभार मानले.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply