उलवे येथील चार इमारती कोरोनाबाधित क्षेत्र घोषित

पनवेल : बातमीदार

पनवेल तालुक्यातील उलवे येथील चार इमारतींमध्ये प्रत्येकी एक एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना बाधित रुग्ण राहात असलेल्या इमारती कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

यामध्ये उलवे येथील प्लॉट नं.64, सेक्टर-5 येथील रेडियन्स स्प्लेन्डर को.ऑ.हौ.सो.,सी विंग, प्लॉट नं.107, सेक्टर-21, त्रिमूर्ती रेसिडेन्सी, ए विंग, प्लॉट नं.200, सेक्टर-17, श्री दर्शन बिल्डिंग, प्लॉट नं.50 बी, सेक्टर-08,स्वस्तिक आदिनाथ सोसायटी इमारती कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केल्या आहेत.

या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड  श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

Zimpler Casinos fifty+ Finest Casinos double tigers slot on the internet Taking Zimpler

Articles Double tigers slot: Could there be one support service to contact?: Guide away from …

Leave a Reply