Breaking News

मृत महिलेच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह; ग्रामस्थांना दिलासा

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावर नेरळ विद्या भवन धामोते या शाळेसमोर असलेल्या फार्म हाऊसमधील 63 वर्षीय महिलेला कोरोना झाला होता. त्या महिलेच्या संपर्कात असलेल्या 25 जणांच्या कोरोना टेस्ट घेण्यात आल्या असून, त्या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. दरम्यान, सदर महिला मृत झाल्याने निर्माण झालेली भीती त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दूर झाली आहे.

नेरळ-कळंब रस्त्यावरील धामोते येथील नेरळ विद्या भवन शाळेसमोर असलेल्या फार्म हाऊसमध्ये राहणार्‍या 63 वर्षीय महिलेची कोरोना टेस्ट 18 मे रोजी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्या महिलेचा ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला, मात्र त्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील पाच आणि अन्य 20 जणांच्या कोरोना टेस्ट आरोग्य विभागाकडून घेण्यात आल्या होत्या. त्या टेस्टचे अहवाल प्राप्त झाले असून सर्व 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्या 25 जणांमध्ये पाच कुटुंबीय, तर एक चोरावले गावातील आणि दोन धामोते गावातील तसेच 17 नेरळमधील, एका हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. सर्वांचे अहवाल जे. जे. रुग्णालयकडून प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने नेरळ, धामोते, चोरावले गावातील नागरिक आणि ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

तर कर्जत शहरातील संजयनगर भागातील कोरोना पॉझिटिव्ह तरुण राहत असलेली इमारत प्रशासनाने सील केली आहे. त्या इमारतीत राहणार्‍या सर्व नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या पत्नीला एमजीएम रुग्णालयात नेले आहे. त्यांचीदेखील कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप प्रशासनाला प्राप्त झाला नाही. सध्या कर्जत तालुक्यात एकमेव कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून तो एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply