Breaking News

भाजपच्या आंदोलनाला पेणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण : प्रतिनिधी – कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपने संपूर्ण राज्यात राज्य सरकारच निषेध करीत ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ हे वाक्य घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात पेणमधील भाजप कार्यकर्तेही सामील होत त्यांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

सरकारच्या विरोधात फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी भाजप आपापल्या घरासमोरील अंगणात आंदोलनाचा कार्यक्रम केला. या वेळी तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, कोकण प्रांतकामगार सेलचे अध्यक्ष विनोद शाह, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी हे उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंग व संचारबंदी नियमांच्या अधीन राहून कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारविरोधात निदर्शने केली.

या वेळी प्रांत कार्यालयात जाऊन भाजपच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील आर्थिक पॅकेज त्वरित घोषित करावे, शिधापत्रिका नसलेल्यांनाही धान्य द्यावे, संपूर्ण कर्जमाफी त्वरीत लागू करावी, खाजगी रूग्णालयात सर्वांना मोफत उपचार मिळावेत, शाळेची फी रद्द करावी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मोफत प्रवासाची सुविधा द्यावी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, घरमालक, बाराबलुतेदार यांना आर्थिक मदत करावी, आधारभूत किमतींवर धान्य खरेदी सुरू करावी, शाळेची फी रद्द करावी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मोफत प्रवासाची सुविधा द्यावी, शेतकर्‍यांना बी-बियाणे मोफत द्यावे, तीन महिन्यांचे घरभाडे माफ करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply