सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये ठिकठिकाणी असलेल्या गटारांमध्ये पाणी साचण्याची समस्या तसेच रस्त्याची समस्या नागरिकांना भेटसावत होती. त्या पर्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या समस्यांची मंगळवारी पाहणी केली होती. त्यानुसार या कामांना सुरुवात झाली असून, त्याचा आढावा परेश ठाकूर यांनी शुक्रवारी घेतला तसेच मिडल क्लास हौसिंग सोसायटीमधील रस्ते आणि गटारांची पाहणी केली.
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून नागरिकांना भेडसवणार्या समस्या जाणून त्या सोडवण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 19 मधील एसटी स्टँड परिसरातील गटारांची पाहणी केली होती. या कामांना सुरुवात झाली असून, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या कामाची पाहणी करून आवश्यक त्यासूचना दिल्या तसेच मिडल क्लास हौंसिंग सोसायटीमधील रस्ते आणि गटाराची अधिकार्यांसोबत पाहणी केली. या वेळी प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, शैलेश गायकवाड, संजय जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.