Breaking News

रोहा तालुक्यात आठ नवे कोरोना पॉझिटिव्ह

रोहे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात पाच कोरोना रुग्ण आढळल्याची ताजी असताना आणखी आणखी आठ व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या संख्या 13 झाली आहे.

मुंबई येथून 23 मे रोजी रोहा तालुक्यातील ऐनवहाळ आणि भालगाव येथे आलेल्या पाच व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळल्या होत्या. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 30 जणांचे स्वॅब नमुने रोहा उपजिल्हा रुग्णालयात घेऊन ते तपासणीसाठी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात पाठविण्यात आले होते. यापैकी चार जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात ऐनवहाळ येथील तीन व भालगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मुंबईहुन पाच व्यक्ती तालुक्यातील वेगवेगळ्या गावांत आल्या होत्या. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्रास होत असल्याने स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, त्यांनाही कोरोनाचे निदान झाले. यात पाले खुद, पाले बुद्रुक, कांटी व घोसाळे येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. नव्या रुग्णांपैकी एकाला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात, तर उर्वरित सात जणांना पनवेल येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply