Breaking News

पनवेलमध्ये पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा

पनवेल : भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेत अर्चना परेश ठाकूर यांनी आपल्या मुलासह सहभाग घेतला होता.

सचिन वासकर ओवे शहराध्यक्षपदी

पनवेल ः ओवेपेठ येथील सचिन धनाजी वासकर यांची भाजप तालुका मंडळ अंतर्गत ओवे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्याबद्दलचे नियुक्तीपत्र तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी अल्पसंख्याक मोर्चाचे तालुकाध्यक्ष मन्सूरशेठ पटेल, भाजप तळोजा विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी, सरचिटणीस जयदास तेलवणे, पनवेल शहर चिटणीस अमरिश मोकल, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष प्रवीण खंडागळे, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे उपस्थित होते.

सुबोध ठाकूर यांच्या आरती संग्रहाचे प्रकाशन

पनवेल ः तालुक्यातील केळवणे पंचायत समिती गण भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुबोध ठाकूर यांच्या आरती संग्रहाचे प्रकाशन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, रवीशेठ पाटील, अनिष ढवळे, सुबोध ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले.

51 रेनबो आईस्क्रिम पार्लरचे उद्घाटन

पनवेल ः शहरात नाडकर्णी हॉस्पिटलच्या समोर नव्याने सुरू झालेल्या 51 रेनबो आईस्क्रिम पार्लरचे उद्घाटन पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी मालक कौस्तुभ गोजे सोबत संतोष गुजरे व अन्य.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply