
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरढोण ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करून प्रितेश मुकादम यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून शिरढोण गावातील नागरिकांना आयुष क्वाथ या रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्या गोळ्यांचे मोफत वाटप केले. कोरोनावर अजूनपर्यंत कोणतीही प्रभावी लस सापडली नसल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे शिरढोण गावातील नागरिकांना भारत सरकारच्या आयुष मंत्रालयद्वारा निर्देशित धुतपापेश्वर कंपनी निर्मित आयुष क्वाथ या औषधाच्या 1100 बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष प्रितेश मुकादम, श्याम पवार, ग्रामपंचायत सदस्य विजय भोपी, रोशन घरत, महादेव घरत, भावेश माळी, हर्षल भोपी, पवन मुकादम, एकनाथ मुकादम, पवन पांडुरंग मुकादम यांची उपस्थित होते.