Breaking News

स्वामी नारायण ध्यान केंद्राद्वारे गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील बावन्न बंगला या विभागात असलेल्या स्वामी नारायण ध्यान केंद्राद्वारे पनवेल परिसरातील जवळपास 28 हजार नागरिकांची गेल्या 42 दिवसांमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मजूर, गरीब, तसेच ज्यांचा हातावर पोट आहे. अशा लोकांची दुर्दशा झाली आहे. त्या अनुषंगाने स्वामीनारायण ध्यान केंद्र पनवेलने गरजू लोकांना जेवण मिळावे. यासाठी 28 मार्च पासून तैयार फूड पॅकेट देण्याचे ठरवले होते. सुरुवातीला 300 लोकांसाठी चालू केले ते हळूहळू 950 फूड पॅकेटचे वितरण रोज केले जात आहे आणि जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत अशा गरजू लोकांना संस्थेमार्फत फूड पॅकेट्स वितरण करण्यात येणार आहे. सुरुवातीला हे वितरण पोलिसांमार्फत नंतर महानगरपालिका मार्फत करण्यात येत आहे. ह्यात मुख्यत्वे कळंबोली, रोडपाली, मार्बल मार्केट, निवारा केंद्र, करंजाडे, डोंबाळा येथील गरजू लोकांना दिले जाते. या कार्याकरिता संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे सोशल डिस्टन्सिंग अंतर्गत काम करीत आहे. आत्तापर्यंत 28 हजार लोकांना याचे वाटप करण्यात आले. ह्या सेवेच्या कार्य करिता महानगरपालिका पनवेल व पनवेल पोलिस स्टेशनचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply