चिरनेर : रामप्रहर वृत्त
शेतकरी राजा मशागतीची कामे आटपून, पेरणीसाठी सज्ज झाला आहे. पावसाची चाहूल लागताच शेतकर्यांची आप-आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी लगबग होणार आहे. उरण तालुक्यातील दोन हजार चारशे हेक्टर क्षेत्र हे लागवडीखालील क्षेत्र असून, यात भातरोपांसाठी 240 हेक्टर जमिनीच्या क्षेत्रावर भातपेरणी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शेतकर्यांना शेताच्या बांधावरच भात बियाणे वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
यात कोकण विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा कृषी अधिकारी पांडरंग शेळके, उपविभागिय कृषी अधिकारी अर्चना सुळ, उरण तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी, उरण तालुका पर्यचेक्षक प्रकाश कदम, प्रभारी कृषी मंडळ अधिक्षक एन. वाय. घरत व कृषी पर्यवेक्षक एन. आर. गरड यांच्या विशेष मार्गदर्शनातून शेतकर्यांना विविध संकरित बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कृषी खात्याच्या उरण तालुका कृषी कार्यालयाच्या आत्मा अंतर्गत येणारे सेंद्रिय गट, महिला बचत गट, कृषीगट आणि आंबा भाजीपाला कृषीगटाचे गटप्रमुख, कृषीमित्र, कृषी सहाय्यक अधिकारी यांच्या सहकार्यातून शेतकर्यांना शेताच्या बांधवावरच बियाने व खते उपलब्ध करून दिली.
त्यासाठी कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, अनंत पाटील, कैलास मुंबईकर, कृषी सहाय्यक डी. टी. केणी, संगिता पाटील, के. पी म्हात्रे, कृषी सहाय्यक आर. पी. भुजनावळे, प्रफुलता दिवे, ए.एफ.पानसरे, एस. एस. ढाकणे, एस. एस. आर्बेलीर, एन. आर. देशमुख, उमेश गाताडी व व्हि. डी. चव्हाण यांनी सहभाग घेतला होता.