गरीब नागरिकांना 700 पुरणपोळ्यांचा गोडवा
पनवेल : रामप्रहर वृत्त
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 700 पुरणपोळीचे वाटप पनवेल खांदा कॉलनी, नवीन पनवेल याठिकाणी गरजू नागरिकांना करण्यात आले.
होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या पोटाची भूक शमविण्यासाठी व्हावा, तसेच प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी, अशी संकल्पना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांना सुचली. त्यानुसार गेल्या तीन वर्षांपासून होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे काम संस्थेतर्फे विविध ठिकाणी केले जाते. होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे यावर्षीही पनवेल शहरामधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोर-गरिबांना व गरजूंना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 700 पुरणपोळीचे वाटप करण्यात आले.
होळी सणाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड असते तसेच होळीत प्रसाद म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी टाकण्याचे कार्यक्रमदेखील होत असतात, मात्र या माध्यमातून अन्नाचा नास होते. तर दुसरीकडे अनेक गोर गरिबांना सणासुदीच्या दिवशीही उपाशीच झोपावे लागते. त्यांची भूक भागविण्याच्या उद्देशाने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी विविध मंडळांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी पोळीदान केले. त्याबद्दल राजे प्रतिष्ठान कामगार सेनेने त्यांचे आभार मानले.
या वेळी महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, समाजसेविका अॅड. हेमा गोतमारे, पनवेल शहराध्यक्ष अनुराग वाघचौरे, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, खांदा कॉलनी उपाध्यक्ष सदाशिव मोरे, ओमकार महाडिक व गंगाराम शिंदे आदी उपस्थित होते.
वाहतूकदारांना सॅनिटायझरचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते प्रमाण व कोरोनापासून घायची काळजी यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रवासी वाहतूक करणार्या व परप्रांतातून पनवेलमध्ये वाहने घेऊन येणार्या 70 वाहतूकदारांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे कळंबोली सर्कल व स्टील मार्केट येथे मोफत सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
या वेळी कर्तव्यावर असणार्या वाहतुक पोलिसांनादेखील सॅनिटायझर वाटप करण्यात आले. या उपक्रमात महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, पनवेल शहराध्यक्ष अनुराग वाघचौरे, खांदा कॉलनी उपाध्यक्ष सदाशिव मोरे, ओमकार महाडिक व गंगाराम शिंदे उपस्थित होते.