Breaking News

मुख्यमंत्री नाही पण माजी मुख्यमंत्री आले

लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण; देवेंद्र फडणवीस यांची वादळग्रस्त मुरूडमध्ये पाहणी

मुरूड : प्रतिनिधी – निसर्ग वादळी वार्‍यामुळे मुरूड तालुक्याचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. असे असताना सुद्धा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फक्त अलिबागलाच भेट दिली. मुरूड तालुक्यात भेट न दिल्याने येथील नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुरूड तालुक्याला भेट देऊन स्वतः या भागाचा दौरा केला. येथील वादळग्रस्तांच्या व्यथा व निवेदन घेऊन आगामी पावसाळी अधिवेशनात निश्चित न्याय मिळवून देणार, असे आश्वसित केल्याने येथील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.

फडणवीस यांनी तालुक्यातील काशीद सर्वे नांदगाव व राजपुरी कोळीवाडा परिसरास भेट दिली. शासनाकडून जास्तीत जास्त रक्कम बागायतदारांना मिळवून देणारा असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

राजपुरी कोळीवाडा येथे जाऊन ज्या बोटी वादळामुळे फुटल्या आहेत त्यांची पाहणी केली. येथील मच्छिमार संस्थांनी ज्या बोटी फुटल्या आहेत त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले व विजय गीदि यांनी केली व त्याबाबतचे निवेदन सुद्धा दिले. तर अलका मोंनाक यांनी राजपुरी येथे जेट्टी साठी रक्कम मंजूर होऊनसुद्धा हे काम पूर्ण झाले नाही याबतचे निवेदन देऊन राजपुरी येथे जेट्टी व्हावी, अशी मागणी केली. फडणवीस यांनी सर्व लोकांचे मनोगत ऐकून शासनाकडून निश्चित न्याय मिळवून देण्याचे आश्वसित केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply