पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष खारघर मंडलातील महिला मोर्च्यामध्ये अनेक महिला पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. बुधवारी (दि. 22) खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
खारघर मंडलातील चार प्रभागातील महिलांची विविध पदांवर नियुक्ती कोरोना काळापूर्वी करण्यात आल्या होत्या, परंतु सरकारी नियमांचे पालन करून त्याचे वाटप करण्यात आले नव्हते.या वेळी उत्तर रायगड महिला मोर्चा उपाध्यक्षा संध्या शारबीद्रे, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे, पनवेल महापालिका प्रभाग ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, नगरसेविका नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, उपाध्यक्ष दिलीप जाधव, बिना गोगरी, सोशल मीडिया जिल्हा संयोजिका मोना अडवाणी, चिटणीस अनिता जाधव, सोशल मीडिया मंडल संयोजक अजय माळी, प्रज्ञा प्रकोष्ट मंडल संयोजक डॉ. राकेश सोमाणी, सहसंयोजक संदीप एकबोटे, प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर बांगर उपस्थित होते.
रायगड जिल्हा महिला मोर्चा सदस्य कल्पना मोरे, खारघर महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, सरचिटणीस साधना पवार, प्रतीक्षा कदम, उपाध्यक्ष आशा बोरसे, मधुमिता जेना, चिटणीस अंकिता वारंग, खजिनदार सुमित्रा चव्हाण, राजश्री नायडू, स्मिता आचार्य, उमेरा खान, शकुंतला लवटे, अनुसया गोपाळे, खारघर तळोजा महिला मंडल सदस्या श्यमाला सुरेश, प्रभाग 3 अध्यक्ष सारिका जाधव, प्रभाग 4 अध्यक्ष आशा शेडगे, प्रभाग 5 अध्यक्ष सीमा खडकर, प्रभाग 6 अध्यक्ष नीलम विसपुते, प्रभाग सरचिटणीस मनीषा तळवलकर सुशीला शर्मा, प्रभाग उपाध्यक्षा अंजली गुप्ता, संध्या पाटील, सुनंदा देसाई, विजय पाटील, सेक्टर अध्यक्षा छाया ढेरे, अश्विनी भुवड, वैष्णवी शिंदे, सेक्टर उपाध्यक्षा नंदा पानसरे, आशा बाबर, चित्रा राव, रंजना जाखड, जयश्री सूर्यवंशी, नूतन डांगळे, प्रीती दिघे, विजयालक्ष्मी सरकार, सुरेखा रे, प्राजक्ता दिवाकर, पूजा पालकर, वनिता मोहिते, सीमा पांडे, विजया ठाकूर, सुजाता पाटील, शीतल मोरे, वर्षां पाटील, पल्लवी सोनावणे, सोशल मीडिया सेल सदस्य शोभा मिश्रा, दुर्गा बन्सल, के. क्षमा राव, माजी सैनिक सेल संयोजक निर्मला यादव, ओबीसी सेल सह-संयोजिका वैशाली प्रजापती तसेच मुंबई, कामगार सेलचे मंडल संयोजक जयदास तेलवणे, कोकण व प. महाराष्ट्र वैद्यकीय विद्यार्थी आघाडीच्या संयोजकपदी विजय उजळंबे यांची नियुक्ती झाली व सर्वांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले.