Breaking News

माणगावात 21 नवे कोरोनाग्रस्त

माणगाव ः प्रतिनिधी   

माणगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी वाढत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील जनतेचीही चिंता वाढली आहे. तालुक्यातील माणगाव येथील 10, मोर्बा गावातील सहा, ढालघर फाटा येथील एक तसेच इंदापूर येथील चार अशा एकूण 21 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच नऊ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी रविवारी (दि. 12) दिली.

माणगाव तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. आतापर्यंत 35 गावांतून 184 जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 107 रुग्ण

स्वतःच्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात एकूण बधितांची संख्या 75 आहे. माणगाव नगरपंचायत हद्द तसेच इंदापूर व मोर्बा या ठिकाणी सातत्याने रुग्ण आढळत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ठोस निर्णय घेऊन कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. जनतेने कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply