आरोग्य प्रहर
संधिवात कोणत्याही वयात होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात प्रामुख्याने गुडघेदुखीची मोठी समस्या आहे. या आजारातून सुटका करून घ्यायची असेल तर काही गोष्टींची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
संधिवात झाला तर हाडे कमजोर होऊन सांधेदुखीची समस्या डोके वर काढते. सांधा म्हणजे गुडघा. हासुद्धा तीन हाडे, गुडघ्यांची वाटी आणि संधिबंधांनी तयार होतो. आपल्याकडे भारतात आपण गुडघ्याचा वापर जरा जास्तच करतो. मांडी घालून बसणे, पाय दुमडून बसणे आदी अनेक क्रियांमुळे गुडघ्यांच्या हालचाली अधिक होऊन तेथील हाडे झिजणे, तेथील वंगण कमी होणे किंवा अतिउष्णतेमुळे गुडघ्याला सूज येते. त्यामुळे गुडघ्याची समस्या सुरू होते.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज आहे. तसेच व्यायामुळे संधिवात दूर होण्यास मदत होते. परिणामी आपले स्नायू अधिक बळकट होतात. संधिवातामुळे होणार्या वेदना टाळण्यासाठी गरम व थंड थेरपीची मदत घ्या. संधिवातामुळे होणार्या वेदनांत यामुळे फरक दिसून येईल. आंघोळ करताना गरम पाणी घ्या. थंड उपचारही एक चांगली थेरपी आहे. यात बर्फाचा वापर करावा.
अॅक्युपंक्चर थेरपीही आपल्यासाठी चांगली आहे. हा एक प्राचीन चिनी वैद्यकीय उपचार आहे. सूज कमी करणे किंवा रक्ताभिसरण होण्यासाठी ही पद्धत अवलंबिली जाते. ध्यानधारणा केल्याने तणावातून सुटका होते तसेच विश्रांती मिळते. यातून आपण संधिवातावर नियंत्रण मिळवू शकतो.
दोन-तीन लसणाच्या पाकळ्या तुपावर किंवा एरंडेलावर परतून दिवसातून एकदा असे दोन-तीन महिने खाव्यात. रोज रात्री झोपताना सुंठीच्या काढ्याबरोबर एरंडेल आपल्या कोठ्यानुसार व वैद्यकीय सल्ल्याने घेणे. संधिवात कमी करण्यासाठी चरबी कमी करणे आवश्यक आहे. जेवणात माशांचा वापर करावा. भारतीय जेवणात सामान्यत: पिवळा मसाला म्हणजे हळद उपयुक्त आहे. संधिवाताची वेदना कमी करण्यासाठी हळद सक्षम आहे. त्यात एक रासायनिक क्युरक्यूमिन समाविष्टीत आहे. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. संधिवात कमी करण्यासाठी मालिश करणे कधीही चांगले. संधिवातामुळे सांध्यांचा भाग कडक होतो किंवा सुजतो. ही सूज कमी करण्यासाठी मालिश करणे एक चांगला उपाय आहे.