Breaking News

माणगाव तालुक्यात 19 कोरोनाबाधित

माणगाव ः प्रतिनिधी

जगभरात हाहाकार माजवणार्‍या कोरोना महामारीने रायगड जिल्ह्यातही धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण आढळले असून जिल्हा प्रशासनाची धावाधाव झाली आहे. कोरोना महामारीने माणगाव तालुक्यात कहरच केला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या चांगली असली तरी तेवढ्याच प्रमाणात तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील जनतेची चिंता वाढली आहे. माणगाव तालुक्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत सात, मोर्बा गावात 10, भिनाड आणि साई गावात प्रत्येकी एक असे एकूण 19 नवे कोरोनाबाधित आढळल्याची माहिती बुधवारी (दि. 15) माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली.

माणगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत तालुक्यातील 40 गावांतून 203 जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 125 रुग्ण स्वतःच्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात बाधितांची संख्या 76 आहे. माणगाव तालुक्यात प्रशासन कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे.

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय …

Leave a Reply