Breaking News

अपहरण करणारी टोळी जेरबंद

पनवेल : वार्ताहर

रागाच्या भरात सहा जणांनी पनवेल येथून एका व्यक्तीचे अपहरण केले होते. या संदर्भात तक्रार दाखल होताच पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत सहा आरोपींना ताब्यात घेतले तसेच अपहरण केलेल्या व्यक्तीची सुखरुपपणे सुटका केली.

ज्ञानेश्वर जाधव (30 रा.औरंगाबाद) व त्याचा सहकारी अपहरण झालेला रवि नांगडे (30 रा.औरंगाबाद) यांनी पनवेल येथे विकण्यासाठी जेसीबी पोकलन असल्याचे बीड येथील काही जणांना सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून जेेसीबी व पोकलन घेण्यासाठी दोन लाख रुपये आगावू रक्कम घेतली. त्यानंतर बीड येथील या व्यक्तीने वस्तू कधी देतो म्हणून पाठपुरावा केला असता या दोघांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबविले. अखेरीस त्यांना पनवेल येथून बोलावून रवि नांगडे (अपहरण झालेला व्यक्ती) यांनी त्या सहा व्यक्तींना पनवेल शहरात ठिकठिकाणी फिरविले, परंतु वस्तू देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या सहा व्यक्तींनी त्यांच्याकडे असलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये त्याला घालून पुणे बाजूकडे त्याला घेवून गेले. यानंतर त्याचा सहकारी ज्ञानेश्वर जाधव याला फोन करून आमचे पैसे दोन लाख रुपये आणून दे व तुझ्या सहकार्याला घेेऊन जा असे सांगितले. ज्ञानेश्वर जाधव यांनी तात्काळ आपल्या सहकार्याचे अपहरण झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसाा पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे व गुप्त बातमीदाराद्वारे रवि नांगडे याला तळेगाव दाभाडे परिसरात घेऊन गेल्याची त्यांना माहिती मिळवली. यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून या सहा जणांना

ताब्यात घेतले व अपहरणकर्त्याची सुटका केली. आरोपींविरुद्ध भा. दं. वी. कलम 365, 384 आदींसह इतर कलमाद्वारे कारवाई करण्यात आली आहे.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

खारघर : रामप्रहर वृत्तखारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत बास्केटबॉल स्पर्धेचेआयोजन करून करण्यात आले.तरुण …

Leave a Reply