Breaking News

कोकण स्तरावरील क्रीडा स्पर्धा उत्साहात

माणगाव : रामप्रहर वृत्त

कोकण विशानेमा ज्ञाती मंडळ व लोणेरे विभाग यांच्या वतीने संपूर्ण कोकण विभागातील गुजराती समाजाच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ या ठिकाणी करण्यात आले होते. यामध्ये बॅडमिंटन व गोळाफेक या क्रीडा स्पर्धांसोबत या वर्षी प्रथमच आपला पारंपरिक लगोरी खेळाची स्पर्धा महाराष्ट्र लगोरी संघटनेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय पदकप्राप्त तुषार दोशी (डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलीस) यांच्या हस्ते लगोरी खेळाचे उगमस्थान ज्यांच्याकडून झाले अशा भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्ज्वलन करून व औपचारिकरित्या लगोरी फोडून उद्घाटन झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती राज्य पुरस्कार विजेते, लगोरी संघटनेचे संदीप गुरव, कोकण विशानेमा ज्ञाती मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गांधी, युवा अध्यक्ष रुपेश शेठ,  उपाध्यक्ष सुबोध मेथा, लगोरी संघटनेचे तांत्रिक मार्गदर्शक भरत गुरव यांच्या उपस्थितीत सुंदर अशी थर्माकोलपासून बनवलेली लगोरीची प्रतिकृती गॅस फुग्यांमार्फत मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आली.

या स्पर्धेत महिलांमध्ये जोगेश्वरी (इंदापूर) संघाने सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले. उपविजेतेपद हिरकणी (लोणेरे) संघाला मिळाले. पुरुषांच्या गटात जयदेव अ लगोरी संघाने (माणगाव) विजेतेपद, तर उपविजेतेपद लोणेरे युवा मंच संघाने प्राप्त केले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरुषांच्या गटात शिहूल शेठ, किरण मेथा यांनी पुरस्कार मिळविले. या स्पर्धेतून निवडलेला संघ पुढे लगोरी लीगसाठी तसेच राज्य स्पर्धेच्या शिबिरासाठी सहभागी होतील, असे लगोरी संघटनेचे गुरव यांनी सांगितले.

गोळाफेक स्पर्धेत पुरुषांच्या गटात सेऊल शेठ प्रथम, तेजस शेठ द्वितीय,महिलांच्या गटात स्नेहल दोशी प्रथम, प्राची शेठ द्वितीय, बॅडमिंटन डबल स्पर्धेत खुल्या पुरुषांच्या गटात सुमित मेहता व तुषार दोशी प्रथम, तर सुगेन शेठ व रोहित गांधी द्वितीय, महिलांच्या गटात मिताली शेठ व मयुरी शेठ प्रथम, कोमल मेहता व अंकिता मेथा द्वितीय, 14 वर्षांखालील बॅडमिंटन डबल स्पर्धेत प्रथम क्रमांक रिया दोशी व आर्या गांधी, द्वितीय क्रमांक नील शेठ व श्रीश शेठ यांनी मिळविला.

बक्षीस वितरण समारंभ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते व भारतीय लगोरी संघटनेचे अध्यक्ष संदीप प्रल्हाद गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण विशानेमा ज्ञाती मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गांधी, युवा अध्यक्ष रूपेश शेट, उपाध्यक्ष सुबोध मेथा, किरण मेथा आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून दीप मेहता, सुमित मेहता, करमले, जुगेन शेठ, तुषार दोशी यांनी, तर प्रमुख तांत्रिक मार्गदर्शक म्हणून भरत गुरव व कोकण विशानेमा ज्ञाती कार्यकारी मंडळाच्या टीममधील रसिका मेथा, रिशम मेथा, विक्रांत मेथा, विक्रांत मेथा, हर्ष शेठ, ओंमकार मेथा, रुद्र मेथा तसेच उदय गांधी, कन्हैया मेथा यांनी परिश्रम घेतले.

लगोरी स्पर्धेत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला. विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ही स्पर्धा यशस्वी केली.या स्पर्धेसाठी आकर्षक चषक व भरघोस रकमेचे रोख पारितोषिके ठेवण्यात आले होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply