Breaking News

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजांस तूर्तास स्थगिती

अलिबाग ः जिमाका

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात 15 जुलैच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 26 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा अध्यादेश बजावला आहे. त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे जनतेची गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 15 ते 26 जुलै या कालावधीपर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ व कायम अनुज्ञप्ती कामकाज, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज व इतर कामकाजास स्थगिती देण्यात आली आहे.

या कालावधीत विविध कामांसाठी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या नागरिकांची कामे टाळेबंदी काळानंतर समायोजित केली जातील. टाळेबंदीच्या कालावधीत नागरिकांना पूर्वनियोजित वेळा मिळालेल्या असल्यास किंवा काही कागदपत्रे सादर करावयाची असल्यास संबंधित नागरिकांची कामे टाळेबंदी संपल्यानंतर केली जातील याची नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कळविले आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply