Breaking News

एक धागा कोविड रक्षणाचा

पनवेल : प्रतिनिधी

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर सामान्य माणसाला त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस अहोरात्र पहारा देऊ लागले. दवाखान्यातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉयपासून महापालिकेच्या सफाई कामगारांपर्यंत अनेकजण कोरोना विरुद्धच्या लढ्यात सैनिक बनून आपले रक्षण करीत आहेत. त्यात काही धारातीर्थी ही पडले तर काहींच्या कुटुंबातील सदस्यांची ही आहुती गेली. या कोविड सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी श्रध्दा पटेल यांनी स्वत: राख्या बनवल्या असून रक्षा बंधनाच्या दिवशी एक धागा कोविड रक्षणाचा  हा उपक्रम नवीन पनवेलमध्ये राबविण्याचा संकल्प केला आहे.

कोरोनाचा संसर्ग राज्यात सुरू झाल्यावर पोलिसांपासून  दवाखान्यातील डॉक्टर, वॉर्ड बॉय, नर्स ते महापालिकेच्या सफाई कामगारांपर्यंत अनेकजण त्याविरुध्द लढण्यासाठी सज्ज झाले. आपण त्यांना कोरोना योध्दा म्हणतो. त्यांना या युद्धात विजय मिळवा यासाठी आपण राखी बनवत असल्याचे श्रध्दा पटेल यांनी सांगितले. यामागे एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, श्रध्दा पटेल या नवीन पनवेलमध्ये राहत असून कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यावर त्यांच्या कुटुंबाची स्थिती हालाखीची असताना त्यांनी आपल्याला मदत मिळाल्यावर आपण सुध्दा कोणाला तरी मदत केली पाहिजे म्हणून आपल्या सोसायटीच्या बाहेर बसणारे भाजीवाले, फळ विक्रेते आणि छोटे फेरीवाले यांना मास्क बनवून वाटले. आता कोरोना योद्ध्यांसाठी स्वत: राख्या बनवीत आहेत. 200पेक्षा जास्त राख्या बनविल्या आहेत. त्यांच्या या एक धागा कोविड रक्षणाचा  उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply