Breaking News

टपरीधारकांकडून अवैध वसुली थांबवा

नगरसेविका राणी कोठारी यांची मागणी

कळंबोली : प्रतिनिधी

कळंबोली शहरातील हाँकर्स झोनमध्ये मला बदनाम करण्याच्या उद्देशाने माझ्या नावाने अवैध वसुली केली जात आहे तेव्हा ती तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका राणी कमलेश कोठारी यांनी  लेखी निवेदनाने कळंबोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्याकडे केली आहे.

पनवेल महानगरपालिका 2016 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर अनधिकृत बांधकामे व फुटपाथवरील भाजीच्या धंद्यासह अन्य धंद्यावर आयुक्त सुधाकर शिंदे यांनी धडक कारवाई करत पालिका हद्दीतील शहरांना साफ सुत्रीता आणली. पण ही कारवाई करताना वर्षानुवर्षे धंदा करणर्‍या भाजीवाले, फळ व टपरिवाल्यावर उपासमारीची वेळ आली. यावर पर्याय म्हणून सिडकोने या धंद्यावाल्यांसाठी उभारलेल्या हाँकर्स झोनमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बसविण्याची आयुक्तांनी परवानगी दिली. या चालून आलेल्या संधीचा काहींनी फायदा घेत मर्जीतल्या लोकांना जागा दिल्या. तर काहींकडून या जागेचा मोबदल्याच्या रुपाने लक्षी घेवून तिचा ताबा दिला. आणि वर्षानुवर्षे भाजी व अन्य धंदे करणारा घरी बसावे लागले. या बहुतेक हाँकर्स झोनमधील दुकानदारांकडून प्रत्येक दिवशी 30 रुपये वसुली केली जात असल्याची खात्रीशीर समजते.

कळंबोलीमधील भाजी मार्केट (मच्छी मार्केट जवळील) मधील भाजीवाल्याकडून मला बदनाम करण्यासाठी माझ्या नावाने अवैध वसुली केली जात आहे तेव्हा ती त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका राणी कमलेश कोठारी यांनी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे. याच्या प्रती गटनेते परेश ठाकूर, उपायुक्त जमीर लेंगरेकर व प्रभाग अधिकारी प्रकाश गायकवाड यांनीही देण्यात आल्या आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply