एमएनएम विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालय, गव्हाण – 100 टक्के

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण विभागातील एमएनएम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे. सन 2019 -2020 इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.यामध्ये चौधरी अनिशा ज्ञानदेव 89.00 टक्के (प्रथम क्रमांक), घरत आर्यन बाळकृष्ण 87.20 टक्के (द्वितीय क्रमांक), तर धाकेड इशिका भगवतीलाल 86.40 टक्के (तृतीय क्रमांक) गुण संपादन करून विद्यालयाचे नाव उंचावले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे, विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन यांनी कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, गव्हाण – 99.36 टक्के
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा निकाल 99.36 टक्के तर ’गरुकुल प्रकल्पाचा सेमी इंग्रजी माध्यमाच्या निकाल 100 टक्के लागला. विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा रंधवे (91.60 टक्के), द्वितीय क्रमांक मीनाक्षी शिरतोडे (90.80 टक्के), तृतीय क्रमांक पूजा बगाटे(90.60 टक्के) या विद्यार्थिनींनी प्राप्त केला. विद्यालयातील 158 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणवत्तेनुसार 64 विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य, 75 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, सोळा विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी व दोन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणीमध्ये यश प्राप्त झाले.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल व एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य आणि विद्यालयाचे आधारस्तंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, शाळा समितीचे सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथजी कोळी त्याचप्रमाणे विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, संस्थेचे लाइफ मेंबर प्रमोद कोळी, लाइफ वर्कर रवींद्र भोईर, ज्यु. कॉलेज विभागप्रमुख प्रा. बी. पी. पाटोळे, सरपंच हेमलता भगत तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व अध्यापकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
सेंट मेरी मल्टीपर्पज विद्यालय, वाशी
पनवेल : रामप्रहर वृत्त
मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परिक्षामध्ये वाशी येथील सेंट मेरीज मल्टीपर्पज हायस्कुलने सुवर्ण यश संपादन केले आहे. श्रुती विजय गुप्ता या विद्यार्थिनीने 97. 40 टक्के गुण प्राप्त करून प्रथम, साक्षी सुजित शेट्टी हिने 97. 20 टक्के गुण मिळवून द्वितीय तर श्रुती रामराज चौहान हिने 97 टक्के गुणाने तृतीय क्रमांक मिळविला. या शाळेतील 92 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 01 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल, कामोठे – 96 टक्के
कामोठे : रामप्रहर वृत्त
न्यू इंग्लिश स्कूल कामोठे विद्यालयाचा दहावीचा निकाल 96 टक्के लागला आहे. विद्यालयातून परीक्षेसाठी 125 विद्यार्थी बसले होते यामधील 120 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 69 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी, 40 विद्यार्थी प्रथम श्रेणी व सहा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहते.
विद्यालयातून प्रथम क्रमांक प्रतीक्षा शेळके 94 टक्के, द्वितीय क्रमांक अश्विनी गीते 93.20 टक्के व प्रज्ञा कुत्तरवाडे 93.20 टक्के आणि तृतीय क्रमांक साक्षी तावरे 92.20% यांनी मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन स्वामी अप्पा म्हात्रे, व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील, माजी चेअरमन बाळाराम चिपळेकर, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक बी. बी. साळुंखे व इतर सर्व कमिटी सदस्य तसेच माजी विद्यार्थी संघ, कामोठे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्या मंदिर, सारंग – 72.20 टक्के
खालापूर : रामप्रहर वृत्त
खालापूर तालुक्यातील विद्या मंदिर, सारंग या विद्यालयाचा दहाविचा निकाल 72.20 टक्के लागला आहे. विद्यालयातून 18 विद्यार्थी बसले होते. त्यातील 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विषेश प्राविण्या तीन, प्रथम श्रेणी तीन, द्वितीय श्रेणी चार, तृतीय श्रेणी तीन जणांना मिळाली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक प्राची गावंडे 79.20 टक्के, द्वितीय साक्षी ठोंबरे 77.20 टक्के, तर सेजल भोंडगे 70.00 टक्के गुण मिळवत तिसरी आली आहे. तसेच साक्षी शिंदे 68.80 टक्के ही चौथी व भावेश कनोजे 65.80 टक्के मिळवून पाचवा आला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्याभवन, नेरूळ – 100 टक्के
नवी मुंबई : बातमीदार
पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत परीक्षेत भरघोस गुण संपादन करून 16 वर्षांची 100% निकालाची परंपरा यंदा देखील कायम राखली. श्रुतिका पाटील हिने 95. 80 टक्के मिळऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. अविष्का महाकाळ व अनुष्का महाकाळ यांनी अनुक्रमे 95. 20 टक्के आणि 94. 60 टक्के गुण मिळवत द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. शाळेतून 37 विद्यार्थ्यांना उच्च प्राविण्य, 25 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी आणि 7 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळेने आजपर्यंत केलेल्या कार्याचे आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व पालकवर्गाकडून कौतुक होत आहे. पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे माजी कार्याध्यक्ष आणि संचालक प्रा. कृ. ना. शिरकांडे, संचालक डॉ. शंकर पांडुरंग किंजवडेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र बोर्हाडे, संचालक दिनेश मिसाळ, प्राचार्य शिवाजी माळी, मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ, श्रीजा नायर, मनिषा मुळीक आणि सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
सुधागड विद्यासंकुल, कळंबोली – 96.22 टक्के
कळंबोली : प्रतिनिधी
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील माध्यमिक शाळेचा मार्च मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा मराठी विभागाचा निकाल 96.51 टक्के, हिंदी विभागाचा निकाल 94.03 टक्के तर इंग्रजी विभागाचा निकाल 98.64 टक्के लागला आहे. या मध्ये मराठी विभागात प्रथम क्रमांक शुभम जगताप 94.20टक्के, द्वितीय क्रमांक श्रेया ढवले 93.60टक्के, प्राजक्ता गायकवाड 93.60टक्के तर तृतीय क्रमांक अदिती सस्ते 93.20टक्के. हिंदी विभागात प्रथम क्रमांक लक्ष्मी गुप्ता 90.80टक्के, द्वितीय क्रमांक दिक्षा पटेल 90.60 टक्के तर तृतीय क्रमांक रितीक विश्वकर्मा 90.20 टक्के. इंग्रजी विभागात प्रथम क्रमांक सत्यम मौर्या 92.00टक्के, द्वितीय क्रमांक विवेक प्रसाद 90.60टक्के तर तृतीय क्रमांक रूपेश यादव 90.20 टक्के गुण मिळाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सु. ए. सो. पालीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, सचिव रविकांत घोसाळकर, प्राचार्य राजेंद्र पालवे, उपमुख्याध्यापिका सरोज पाटील, कार्यालयीन अधीक्षक दत्ता शिंदे, इंग्रजी विभागाच्या प्रमुख कल्पना कुळकर्णी, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
सेंट जोसेफ हायस्कूल – 100 टक्के
पनवेल : रामप्रहर वृत्त
मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या माध्यमिक शालांत परीक्षेत यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा निकाल 100 टक्के लागलेला आहे. शाळेत प्रथम क्रमांक आदिती मीना व अफजान जमादार या दोघांनी 96.20 टक्के गुण प्राप्त करून आपले स्थान प्रस्थापित केलेले आहे. त्याचप्रमाणे मंथन ठाकरे 95.8 टक्के व लावण्या चौधरी 95.5 टक्के गुण प्राप्त करून हे अनुक्रमे दुसर्या व तिसर्या क्रमांकावर आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ए. एफ पिंटो व व्यवस्थापिका ग्रेस पिंटो यांनी अभिनंदन केले आहे.
सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर, चौक – 93.98 टक्के
खालापूर : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदीर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाल 93.98 टक्के लागला आहे. विद्यालयातून 183 विद्यार्थी बसले होते. त्यातील 172 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम क्रमांक आदिती साळवी 91.80 टक्के, द्वितीय रिया शेट्ये 91.60 टक्के, तर अपेक्षा पाटील 90.80 टक्के गुण मिळवत तिसरी आली आहे. तसेच प्रणाली पवार 90.40 टक्के ही चौथी व कल्याणी पाटील 90.20 टक्के मिळवून पाचवी आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक, कर्मचार्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
उरणमध्ये 94.47 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
उरण : प्रतिनिधी
दहावीच्या परीक्षेत उरण तालुक्यातून 94.47 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उरण तालुक्यातील 28 शाळांमधून 2243 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यामध्ये 1172 मुले तर 1071 मुलींचा समावेश होता. यापैकी 1087 मुले तर 1031मुली असे एकूण 2118 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उरण तालुक्याचा निकाल 94.47 टक्के लागला असून यामध्ये उत्तीर्ण होणार्यांमध्ये मुलींची सर्वाधिक संख्या 96.27 टक्के तर मुलांची संख्या 92.75 टक्के आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper