पेण ः प्रतिनिधी
पेण नगर परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, डॉक्टर्स, संघ परिवार यांच्या सहकार्याने नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या पुढाकाराने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू आहे. गुरुवारी गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळच्या सुमारास बालाजी कॉम्प्लेक्स, शीतल विहार, शिवानी संकुल, वास्ट पॅलेस, नगर परिषद चौक येथे कॅम्प लावून नागरिकांची ऑक्सिजन क्षमता व तापमान तपासणी करण्यात आली.
या वेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, बांधकाम सभापती राजा म्हात्रे, भास्कर पाटील, समन्वयक विशाल शिंदे, अजय क्षीरसागर, नीरज साठे, अनिरुद्ध ओक, अभिराज कडू, अक्षय पाटील, रोहन सोनावणे, गणेश सारंगकर, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते. या वेळी रामवाडी, आर. पी. नगर, युनायटेड, एसटी कॉलनी, मोकल चाळ आदी ठिकणीही तपासणी करण्यात आली.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …