पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका आणि शहर महिला मोर्चाची कार्यकारिणी मंगळवारी (दि. 28) पनवेल भाजप पार्टी ऑफीस येथे जाहीर करण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर मंडल अध्यक्ष जयवंत पगडे तसेच उत्तर रायगडच्या महिला अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका महिला अध्यक्षा रत्नप्रभा घरत आणि पनवेल महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती नगरसेविका कुसुमताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
तालुका कार्यकारिणी
तालुका सरचिटणीसपदी लीना पाटील, प्रतिभा भोईर, तर उपाध्यक्षपदी समिना साठी, रेखा म्हात्रे, योगिता भगत, अनुसया घरत, चिटणीसपदी नीता चोणकर, कल्पना ठाकूर, शिल्पा म्हात्रे, मनीषा घरत, नंदा ठाकूर, स्नेहलता ठाकूर, इंदुमती पाटील, इंदुताई म्हात्रे, जयश्री कोळी व कोषाध्यक्षपदी ज्योती भोपी यांची नियुक्ती करण्यात आली.
शहर कार्यकारिणी
शहर कार्यकारिणीत वर्षा नाईक अध्यक्षपदी, सपना पाटील सरचिटणीसपदी, सुहासिनी केकाणे, नीता माळी उपाध्यक्षपदी, दीपाली बांद्रे, स्नेहल खरे चिटणीसपदी, आदिती मराठे कोषाध्यक्षपदी, तर सदस्यपदी ज्योती देशमाने, मनीषा चिले, अंजली इनामदार, सुहासिनी शिवणेकर, मनीषा बहिरा, नीता घाटुगडे, नंदा टापरे आणि अनिता रणदिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …